Lockdown 3.0: ‘दारू’ची इच्छा अशी की ‘गारपीट’ पडण्याचीही पर्वा नाही, पहा ‘VIDEO’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना लॉकडाऊन मध्ये मद्य दुकानांसह अन्य व्यावसायिक कामे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इतर व्यावसायिक आस्थापनांपेक्षा अल्कोहोलविषयी लोकांना एक वेगळी आवड निर्माण झाली आहे आणि देशभरात दारू विकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा दिसत आहेत.

या व्यतिरिक्त, कुठे बरेच लोक दारूच्या हव्यासापोटी सोशल डिस्‍टेंसिंगचे नियम मोडत आहेत. तर कुठे सोशल डिस्‍टेंसिंगच्या पालनासाठी बिअरच्या बाटल्या ठेऊन आपल्या पाळीची वाट पाहत आहेत, पण उत्तराखंड येथील नैनीतालच्या माल रोडवरील दृश्य पूर्णपणे वेगळे आहे. खरं सांगायचं झालं तर ते खरोखरच धक्कादायक आहे.

गारपीट आणि पाऊस दरम्यान प्रतीक्षा

नैनीतालच्या माल रोडवर जोरदार वादळी पाऊस आणि गारपिट होत असूनही लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत दारूच्या लांब रांगेत उभे राहून अखेर दारू खरेदी केलीच. बरेच लोक छत्री विना रांगेत उभे होते, या आशेने की ते दारू विकत घेतल्यानंतर ते घरी जातील. तथापि, मोठ्या संख्येने दारूच्या दुकानांत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने त्यांच्या महसुलात होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी 50 ते 70 टक्के दारूवर ‘स्पेशल कोरोना सेस’ लावला आहे. असे असूनही, लॉकडाऊन 3 च्या पहिल्या दिवशी सोमवारी जशा रांगा पाहण्यास मिळाल्या होत्या, अगदी तसेच चित्र मंगळवारीदेखील दिसून आले.

देशात गेल्या 24 तासांत 3,900 नवीन प्रकरणे, 195 मृत्यू

गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे 3,900 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 195 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात आजपर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. या आकडेवारीबाबत मंगळवारी माहिती देताना आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले की काही राज्ये या प्रकरणांबाबत वेळेवर माहिती देत नाहीत, ती समस्या सध्या सोडविण्यात येत आहे. कोविड -19 च्या देशातील परिस्थितीबद्दल आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या आता 46,433 वर पोहोचली आहे आणि मृतांची संख्या 1,568 झाली आहे.