Nana Patole | महाविकास आघाडीत धुसपूस, नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाविकास आघाडी सरकारमधील (MVA government) घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची (Congress) नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांसमोर खदखद व्यक्त केली. एवढंच नाही तर त्यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली. तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदी काँग्रेसचा व्यक्ती बसवण्याची शपथ घ्या, असे आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले.

Nana Patole | lonavala news nana patole angry on ncp and shiv sena serious allegation on ajit pawar in lonavala pune

मी बोललो तर त्रास होतो, ते बोलले की ठीक

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्यास सांगितले. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही, असा चिमटा पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना काढला.

बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री कुणाचेच ऐकत नाहीत

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा
साधला. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची काम करतात. आपल्या लोकांची
कामं करतात का ? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की
नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण त्यांची सही लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही, असा टोला
त्यांनी अजित पवारांना लगावला.

सोबत राहून पाठीत सुराच खुपसायचा असेल तर…

कोणत्याही समितीवर नाव पाठवायची असतील तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास आहे, या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा. या त्रासाला आपली मानसिक कमजोरी बनवू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मी माझ्या कर्माने उद्याच्या काळात इथला पालकमंत्री (Guardian Minister) बनेल, आमच्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघालं पाहिजे. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहून पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्यालाही काही बोलायचंच नाही. तो राग आपली ताकद बनवा, असेही नाना पटोले म्हणाले.

हे देखील वाचा

Fact Check | प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला केंद्र सरकार नोकरी देतंय का? जाणून घ्या या वायरल बातमीचे सत्य

#HealthFirst | व्हिटॅमिन D ची कमतरता असलेल्यांसाठी ‘संसर्ग’ अत्यंत धोकादायक, जाणून घ्या

Crime in Mumbai | खाजगी रुग्णालयात 21 वर्षीय नर्ससोबत घृणास्पद कृत्य, आरोपी डॉक्टर फरार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Nana Patole | lonavala news nana patole angry on ncp and shiv sena serious allegation on ajit pawar in lonavala pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update