Nana Patole On Prakash Ambedkar | आंबेडकरांच्या आरोपाला पटोलेंचे प्रत्युत्तर, ”देवेंद्र फडणवीसांशी माझे चांगले संबंध, आम्ही एकमेकांना पक्षातील गोष्टी…”

अकोला : Nana Patole On Prakash Ambedkar | महाराष्ट्रात मित्रत्वाचे संबंध ठेवण्याची चांगली परंपरा आहे. त्यानुसार भाजपा (BJP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपाचे स्थानिक खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre), यांच्याशी चांगली मैत्री आहे. आम्ही एकमेकांना गोष्टी सांगत असतो. मात्र, मैत्री आणि विचार वेगवेगळ्या जागी आहेत, असे म्हणत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले. अकोल्यात काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील (Dr Abhay Patil) यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचार सभेत बोलत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपमधील नेत्यांशी छुपे संबंध आहेत, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या आरोपाला पटोले यांनी आज प्रत्युत्तर दिले. मतविभाजन टाळण्यासाठी शेवटपर्यंत सोबत घेण्याचे प्रयत्न करूनही वंचितने सातत्याने अवमान केला, असा आरोप पटोले यांनी केला.

नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. यादी कशी मंजूर केली, ते मला सांगतात. आमच्याकडील किंवा त्यांच्याकडील पक्षातील कोण बदमाश आहेत, हे आम्ही एकमेकांना सांगत असतो. मैत्री आहेच, ती नाकारता येणार नाही.

नाना पटोले म्हणाले, भाजपच्या खेळीतून महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले. महापुरुषांच्या विचाराला संपुष्टात आणून त्यांचा अवमान करण्याचे काम सातत्याने भाजपने केले. संविधान व्यवस्था संपवून टाकण्याचा त्यांचा डाव आहे. गुलामीकडे नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

प्रकाश आंबेडकरांवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येकवेळी माझ्या विरोधात उमेदवार दिला.
२५ नोव्हेंबरला मुंबई येथील सभेत देखील अवमान केला. मविआमध्ये वाटाघाटीमध्ये देखील तेच झाले.
आंबेडकर स्वत: कधीच मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले नाही.
वंचितकडून मला नेहमी खालच्या पातळीवर लक्ष्य करण्यात आले.

नाना पटोले म्हणाले, मी भाजप सोडल्यापासून ते माझा राग करतात का माहीत नाही.
मी देखील वंचित असून माझ्यावर टीका का?. वंचितवर टीका करताना ते पुढे म्हणाले,
वंचितने शिरुर मतदारसंघात जाहीर केलेला उमेदवार काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच ते फडणवीसांसोबत होते, यावरून समजून घ्या, अशी टीका पटोले यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

Mahavikas Aghadi Protest | सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन (Video)

Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून 6 मुलींची सुटका