शरदराव आप भी…आप वहां शोभा नहीं देते : नरेंद्र मोदी

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेस आणि त्यांच्या भेसळयुक्त सरकारमुळेच ही अवस्था आहे. कॉंग्रेसकडून देशाला काही अपेक्षा नाही. परंतु शरदराव तुम्हीही. तुम्ही तिथे शोभत नाही. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर मधील औसा येथील प्रचार सभेत केलं. लातूरच्या औसा येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सभा आयोजित करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथेही शरद पवार यांच्यावर मिश्किल टिका केली. ते म्हणाले की, १९४७ ला कॉंग्रेस खंबीरपणे उभं राहिलं असतं. तर पाकिस्तानचा जन्म झाला नसता. देशात देशद्रोहाचं कलम हटविण्याची घोषणा कॉंग्रेस करत आहे. त्यांना भारताच्या एकेकाला याचं उत्तर द्यावं लागेल. कॉंग्रेस आणि मिलावटी सरकारमुळेच देशाची ही अवस्था आहे. परंतु शरदराव तुम्हीही. तुम्ही तिथे शोभत नाही.