Nashik Crime | भाजपा मंडल अध्यक्षाची सपासप वार करुन हत्या; प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | येथील सातपूर भाजपा (BJP) मंडल अध्यक्षावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. युनियनच्या वादातून ही हत्या (Nashik Crime) झाल्याचे सांगितले जात आहे.

 

अमोल इघे असे हत्या (Murder) झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. अमोल इघे (Amol Eghe) हे भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष होते. अमोल यांना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्यानंतर ते सातपूर एमआयडीसीमधील कार्बन नाका परिसरात आले. तेथे त्यांच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत (Nashik Crime) घोषित केले. युनियनच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

गेल्या ५ दिवसात नाशिक शहरात हत्येची ही तिसरी घटना आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर (Pooja Ambekar) यांची हत्या करण्यात आली होती.

 

Web Title :- Nashik Crime | nashik bjp leader amol eghe murder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shashikant Shinde | राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही – शशिकांत शिंदे

Sharad Pawar | ‘4 वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस’ ! शरद पवार म्हणाले – ‘माझ्यापेक्षा पूनावालांचे कर्तृत्व मोठे’

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नवीन वर्षापुर्वीच मोदी सरकार देईल गिफ्ट, बँक अकाऊटमध्ये येतील 4000 रुपये