भारतात प्रदूषणामुळे 5 वर्षापर्यंत कमीहोतंय वय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात प्रदूषणाची स्थिती भीषण होत चालली आहे. प्रदूषणामुळे भारतात माणसाच्या सरासरी वय 5.2 वर्ष आणि राष्ट्रीय मानकानुसार 2.3 वर्ष कमी होत आहेत. हा खुलासा शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टीट्यूटच्या रिपोर्टमध्ये केला आहे.

रिपोर्टनुसार, भारताच्या 1.4 अरब लोकसंख्येचा एक मोठा भाग अशा ठिकाणी राहात आहे, जेथे पर्टिकुलेट प्रदूषणचा सरासरी स्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा जास्त आहे, तर 84 टक्के लोक अशा ठिकाणी राहात आहेत, जेथे प्रदुषणाचा स्तर भारताद्वारे ठरवलेल्या मानकापेक्षा जास्त आहे. रिपोर्टमध्ये हेदेखील समोर आले आहे की, 1998 ते 2018 पर्यंत भारताच्या प्रदुषणात 42 टक्के वाढ झाली आहे.

रिपोर्टमध्ये इशारा दिला आहे की, प्रदूषणाचा स्तर जर असाच वाढत राहिला तर उत्तर भारतात राहाणार्‍या लोकांचे सरासरी वय 8 वर्षाने कमी होऊ शकते. भारतातील एक चथुर्तांश लोकसंख्या अशा प्रदुषणाला तोंड देत आहे, जसे अन्य कोणताही देश देत नाही. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सर्वाधिक वय कमी होत आहे. लखनऊमध्ये हे प्रमाण डब्ल्यूएचओच्या मानकापेक्षा 11.2 जास्त आहे. हाच स्तर कायम राहिल्यास येथील लोकाचे वय 10.3 वर्षांनी कमी होईल.

भारताची राजधानी दिल्लीत सुद्धा प्रदुषणाचा स्तर धोकादायक आहे. हाच स्तर जारी राहिल्यास सरासरी 9.4 वर्षांनी वय कमी होईल. प्रदूषणाचा स्तर डबल्यूएचओच्या मानकानुसार बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यात सुद्धा सर्वसामान्यांचे जीवन सात वर्षांनी वाढवता येऊ शकते. तर, हरियाणाच्या लोकांचे जीवन आठ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.

मिल्टन फ्रीडमॅन प्रोफेसर आणि एनर्जी पॉलिसी इन्स्टीट्यूटचे संचालक आणि अर्थशास्त्राचे प्रोफेसर मायकल ग्रीनस्टोन म्हणतात की, कोरोना व्हायरसचा धोका खुप जास्त आहे. यावर गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु इतक्याच गांभिर्याने वायु प्रदुषणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून करोडो-अरबो लोकांना अधिक निरोगी जीवन जगण्याचा हक्क मिळावा. मायकल ग्रीनस्टोन यांनीच शिकागो युनिव्हर्सिटीत ऊर्जा नीती संस्था (ईपीआयसी) मध्ये आपल्या सहकार्‍यांसह मिळून एक्यूएलआयची स्थापना सुद्धा केली आहे.

भारत बनवत आहे धोरण

शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टीट्यूटच्या रिपोर्टनुसार, सध्या भारतातील लोकांनी वायु प्रदूषणाची समस्या ओळखली आहे आणि सरकारने सुद्धा यावर पावले उचलली आहेत. 2019 मध्ये केंद्र सरकारने प्रदूषणाविरूद्ध युद्ध सुरू केले होते आणि नॅशनल क्लीन एयर प्रोग्राम सुरू केला होता.

या प्रोग्रामचा हेतू पर्टिकुलेट प्रदूषणाला येत्या पाच वर्षात 20 ते 30 टक्के कमी करणे होता. रिपोर्टमध्ये शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, जर भारत आपल्या अभियानात यशस्वी झाला नाही तर त्यास याचे गंभीर दुष्परिणाम पहायला मिळू शकतात. प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याने देशातील लोकांचा सरासरी जीवनदर 1.6 वर्ष (जर 25 टक्के कमी झाला तर) वाढेल आणि दिल्लीच्या लोकांचे जीवन 3.1 वर्षाने वाढेल.

मिल्टन फ्रीडमॅन प्रोफेसर आणि एनर्जी पॉलिसी इन्स्टीट्यूटचे संचालक आणि अर्थशास्त्राचे प्रोफेसर मायकल ग्रीनस्टोन म्हणतात की, प्रत्यक्षात सध्या जे उपाय आणि संसाधने भारताकडे आहेत, त्यामध्ये वायु प्रदूषणाच्या स्तरात चांगली सुधारणा करण्यासाठी मजबूत पब्लिक पॉलिसी परिणामकारक उपाय आहे. एक्यूएलआय रिपोर्टच्या माध्यमातून सामान्य लोक आणि धोरणे ठरवणार्‍यांना सांगितले जात आहे की, कशा प्रकारे वायु प्रदुषण त्यांना प्रभावित करत आहे. सोबतच, प्रदूषण कमी करण्यासाठी रिपोर्ट कशाप्रकारे वापरला जाऊ शकतो, सांगितले जात आहे.

शिकागो युनिव्हर्सिटीसोबत गुजरातमध्ये संशोधन

भारतात राज्य सरकारे वायु गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी अगोदरपासून प्रयत्नशील आहेत. पार्टिकुलेट मॅटर (कण प्रदूषण) साठी जगातील पहिले एमिशन ट्रेडिंग सिस्टम (ईटीएस) शिकागो युनिव्हर्सिटीसोबत मिळून गुजरातमध्ये सुरू आहे, जेथे शिकागो युनिव्हर्सिटी आणि गुजरात प्रदूषण कंट्रोल बोर्डसोबत अन्य लोक मिळून काम करत आहेत. सूरतमधील या पायलट प्रोजेक्टअंतर्गत औद्योगिक यंत्रांतून निघणार्‍या कण प्रदूषणाला कमी करण्यावर संशोधन सुरू आहे.

ग्रीनस्टोन म्हणतात की, इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. चांगली धोरणे प्रदूषण कमी करू शकते. तसेच लोकांचे जीवन वाढवू शकतात. भारत आणि दक्षिण आशियाच्या नेत्यांसाठी पुढील यशाची काहानी लिहिण्याची खुप शानदार संधी आहे, कारण आर्थिक विकास आणि पर्यावरण गुणवत्तेच्या दुहेरी लक्ष्याचे संतुलन ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. सूरत ईटीएसचे यश सांगते की, बाजारावर अधारित लवचीक दृष्टीकोनाद्वारे दोन्ही लक्ष्य एकाच वेळी मिळवता येऊ शकतात.

पर्टिकुलेट मॅटर

पर्टिकुलेट मॅटर किंवा कण प्रदूषण वातावरणातील ठोस कण आणि तरल कणांचे मिश्रण आहे. हवेत असलेले कण इतके छोटे असतात की, उघड्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाही. काही कण इतके छोटे असतात की ते केवळ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपशिवाय दिसू शकत नाहीत. कण प्रदूषणात पीएम 2.5 आणि पीएम 10 सहभागी आहेत, जे खुप धोकादायक असतात.

पर्टिकुलेट मॅटर विविध आकारांचे असतात आणि ते मानव आणि नैसर्गिक दोन्ही स्त्रोतांमुळे असू शकतात. हे स्रोत प्रायमरी आणि सेकेंडरी असू शकतात. प्रायमरी स्रोतात ऑटोमोबाइल उत्सर्जन, धूळ आणि जेवण बनवण्याचा धूर सहभागी आहे. प्रदूषणाचा सेकेंडरी स्रोत सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड सारख्या रसायनांची गुंतागुंतीची प्रतिक्रिय असू शकतो. हे कण हवेत मिसळतात आणि तिला प्रदुषित करतात.

याशिवाय, जंगलातील आग, लाकडाने पेटवल्या जाणार्‍या चुली, स्टोव्ह, कारखान्यांचा धूर, निर्माण कार्यातून तयार होणारी धूळ इत्यादी वायु प्रदूषणाचे स्रोत आहेत. हे कण आपल्या फुफ्फुसात जातात, ज्यामुळे खोकला आणि अस्थमा सारखे आजार होऊ शकतात. तसेच यामुळे उच्च रक्तदाब, हार्टअटॅक, स्ट्रोक आणि अन्य गंभीर आजार होण्याचा धोका असतो.