मुंबई-पुण्यात गर्दी ! शिवसेनेच्या ’सामना’मध्ये केंद्र सरकार आणि युपी-बिहारच्या मुख्यमंत्र्यांना घेरले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे मुखपत्र ’सामना’च्या संपादकीयमध्ये मुंबई-पुणे शहरात वाढत असलेल्या लोकसंख्येवरून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. एवढेच नव्हे, शिवसेनेने पुन्हा एकदा परप्रांतिय आणि युपी-बिहारहून आलेल्या लोकांना मुंबई-पुण्यातील मोठ्या गर्दीला जबाबदार धरले आहे.

संपादकीयमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला आहे, ज्यामध्ये गडकरी यांनी मुंबई-पुण्याची गर्दी कमी करण्यासाठी या शहरांच्या बाहेर दुसर्‍या स्मार्ट सिटी तयार करण्याबाबत म्हटले होते. या वक्तव्याच्या संदर्भाने सामनाच्या संपादकीयमध्ये विचारण्यात आले आहे की, हे कसे होणार?

संपादकीयमध्ये शिवसेनेने मोदी सरकारवर हल्ला करत म्हटले आहे की, 2015 मध्ये मुंबई-पुणेसारख्या शहरांना स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा झाली होती. त्या स्मार्ट सिटी कुठे आहेत? 15% सुद्धा काम झालेले नाही. याशिवाय शिवसेनेने युपी आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर तिखट टिपण्णी केली आहे.

शिवसेनेने म्हटले की, दोन्ही राज्यांच्या (युपी आणि बिहार) मुख्यमंत्र्यांनी प्रवासी मजूर परतल्यावर दावा केला होता की, त्यांना परत बोलावण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक असेल, परंतु आता हे मजूर परतत आहेत.

शिवसेनेने म्हटले की, महाराष्ट्र आणि मुंबईची चिंता करणे सोडून द्या. प्रथम आपल्या राज्यात रोजगार वाढवा. मुंबई-पुण्यातील लोकांची गर्दी आपोआप कमी होईल.