बुट ‘पॉलिश’ करत होता, नशीबानं ‘दरवाजा’ असा उघडला, बनला सुरांचा ‘राजा’, लोक झाले ‘दिवाने’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्हणतात ना कुणाचं नशीब कुठे चमकेल काही सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट आहे सनी नावाच्या तरुणाची. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यामुळे हा तरुण बूट पॉलिश करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण त्याच्याकडे एक सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे त्याचा आवाज आणि त्याची गाण्याची आवड यामुळे तो ‘इंडियन आयडल’ सारख्या रिऍलिटी शो मध्ये झळकला आणि त्याचं नशीबच पालटल. सोशल मीडिया वर देखील त्याच्या गाण्याचे मोठे कौतुक होत आहे. आता त्याची एक वेगळीच ओळख तयार झाली आहे. जाणून घेऊया सनीच्या संघर्ष आणि यशाच्या मधली गोष्ट….

आनंद महिंद्रा देखील झाले भावुक
सनी मूळचा पंजाबमधील बठिंडा जिल्ह्यातील रहिवासी. सनी येथील अमरपुरा येथील गल्ली क्रमांक -1 येथे राहतो. इंडियन आयडॉलमध्ये येण्यापूर्वी सनी आपले घर बूट पॉलिशचे काम करून चालवत असे. कोणतेही प्रशिक्षण न घेता सनीने इंडियन आयडॉलच्या ऑडिशनमध्ये आपली छाप सोडली. सनीचा हा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रानेही शेअर केला होता आणि ते देखील भावनिक झाले.

सनीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्याचं घर असं की ज्याला नीट छप्पर देखील नाही, ना दरवाजे. कडाक्याच्या थंडीत देखील त्याचे कुटुंब या अशा छप्पर आणि दरवाजे नसलेल्या घरात राहत होतं. सनीच्या कुटुंबामध्ये त्याच्याव्यतिरिक्त त्याची आई आणि तीन बहिणी राहतात. सनी कडून त्याच्या कुटुंबाला खूप अपेक्षा आहेत. जेव्हा सनी टीव्ही वर गाणं म्हणायला येतो तेव्हा त्याची आई आणि त्याच्या बहिणी शेजाऱ्यांच्या टीव्ही वर जाऊन त्याचे गाणं पाहतात.

सनीच्या घरात गॅस कनेक्शन नाही. आजही त्याच्या घरात भाकरी ही चुलीवरच बनते. त्याचे कुटुंब जरी हलाखीतून जगत असले तरी सनीचा निश्चय मात्र ठाम आहे. सनी म्हणतो की जर देवाची इच्छा असेल तर तो लवकरच त्याच्या कमाईतून घर बांधेल. सनीला हिमेश रेशमिया यांनी एका गाण्यासाठी संधी दिली आहे तसेच कुमार ब्रदर्स कंपनी देखील सनी कडून गाणं गावून घेणार आहे.

सनीला परदेशातून मदत
आपल्या गायनाच्या शैलीमुळे सनी सोशल मीडियावर गाजत आहे. त्याच्या गाण्याचे व्हिडीओ सोशलवर धुमाकूळ घालत आहेत. सनीच्या घरची परिस्थिती पाहून त्याला परदेशातील एका दाम्पत्याने मदत देऊ केली आहे. एनआरआय शारदा शुक्लाला जर्मनी मध्ये आपल्या पतीसोबत राहतात. त्यांनी सोशल मीडियावर सनीचे व्हिडीओ पाहुन सनी साठी एक लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. त्यामुळे आता सनीच्या घराचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. शुक्ला दाम्पत्याने असे देखील सांगितले आहे की, सनी चे घर ठीक करण्यासाठी जेवढा खर्च येईल तो सर्व खर्च ते करणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही यश कसे मिळू शकते हे सनी सारख्या तरूणाने सिद्ध केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/