तलाकची नोटीस पाठवल्यानंतर लगेचच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीनं बदललं नाव !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिनं आता तलाक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिनं नवाजला व्हॉट्स अ‍ॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. अद्याप नवाजकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. आलिया तलाकसोबतच मुलांची कस्टडीदेखील मागितली आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखीत आलियानं तलाक घेण्याच्या कारणाबद्दल सांगितलं आहे. याशिवाय तिनं यात तिनं नाव बदललं आहे असंही ती म्हणाली आहे.

नवाज आणि आलियाच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. एका मुलाखतीत बोलताना आलियानं सांगितलं की, तिनं तिचं नाव बदलून अंजना आनंद किशोर पांडे ठेवलं आहे. आलिया म्हणाली, “हे नातं संपल्यांनंतर मला नाही वाटत की, मी नवाजच्या नावाचा वापर करावा. नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी हे नातं संपवण्याचं प्रमुख कारण आहे.”

अंजना एका हिंदू ब्राह्मण कुटुंबातून आहे. पाच वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर तिनं नवाजसोबत लग्न केलं होतं. दोघांचा 10 वर्षांपूर्वी निकाह झाला होता. यानंतर अंजनानं इस्लाम धर्म स्विकारत नावही बदललं होतं. तेव्हा नवाजुद्दीन आजच्यासरखा यशस्वी नव्हता.