विधानसभा 2019 : शरद पवारांनी बीड जिल्हयातील 5 उमेदवारांची नावे केली जाहीर, परळीत PM Vs DM

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बीड जिल्ह्यातील काही उमेदवारांची घोषणा त्यांनी केली. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच संभाव्य उमेदवारांची घोषणा केली. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी त्यांनी जाहीर केली.

बीडमधील कार्य़क्रमात बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिेल. तसेच मी तरुणांच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे, असे सांगत शरद पवार यांनी पाच उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे पवार यांनी तरुणांना संधी दिल्याने तरुणामध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याच घोषित केले. तर गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, केजमधून नमीता मुंदडा यांच्या नावाची घोषणा केली. तसेच बीडमधून संदीप क्षीरसागर, आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवार यांनी जाहिर केले. तर जिल्ह्यातील एकमेव बाकी राहिलेल्या आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहिर करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.

परळीतून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता परळीत पंकजा मुंडे विरूध्द धनंजय मुंडे असाच सामना रंगणार आहे.

visit : policenama.com