NCP Chief Sharad Pawar | ‘ज्या माणसाची स्वत:च्या जिल्ह्यातून येण्याची क्षमता नाही, त्यांच्यावर….’; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली असल्याचे विधान भाजप (BJP) नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ज्या माणसाची स्वत:च्या जिल्ह्यातून येण्याची क्षमता नाही. त्यांच्यावर काय भाष्य करायचं अशा शब्दात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) विजेता शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, ते फार शक्तिमान गृहस्थ आहेत. त्यांचे एक घर कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूर सोडून कोथरुड येथे त्यांना यावे लागले. कोथरुडमध्ये त्यांचे काय योगदान होते त्याबद्दल कोथरुडकरांनाच विचारलेले बरे राहील. तसेच ज्या माणसाची स्वत:च्या जिल्ह्यातून येण्याची क्षमता नाही, त्यांच्यावर काय भाष्य करायचे अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

म्हणून मी महाराष्ट्र केसरीला आलो नाही
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सोहळ्याचे तुम्हाला निमंत्रण नव्हते का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मला स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे निमंत्रण होते. परंतु मला मुंबईत काही महत्त्वाचे काम होते. त्यामुळे मी आलो नाही, असे त्यांनी सांगितले. कुस्तीगीर परिषदेच्या वादावर बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा वाद कोर्टात आहे, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही. आपण खेळावर लक्ष दिले पाहिजे, इतर बाबींवर जास्त चर्चा करायला नको, असे शरद पवार म्हणाले.

 

गाजावाजा न करता मी मदत करतो
मी आज जाहीरपणे सांगतोय, अनेक खेळांना आणि खेळाडूंना मी पाठिमागून मदत करण्याची भूमिका घेत आलो आहे.
क्रिकेटसाठी देखील मी कम केले आहे. पण कुस्तीसाठी मी विशेष प्रयत्न करत आलो आहे.
सर्व कुस्तीतील पैलवान हे ग्रामीण भागातून येतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अडचणींवर मात करुन मल्ल यश मिळवत असतात.
त्यांना चांगले प्रशिक्षण मिळणे गरजचे असते. ती जबाबदारी काका पवार (Uncle Pawar) यांनी उचली आहे.
आज पहिल्यादा आम्ही हे जाहीरपणे सांगत आहोत. आजवर मी हे कधीही सांगितले नाही.
कोणताही गाजावाजा न करता मी ही मदत करत होतो, असे पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar comment on chandrakant patil over pune during maharashtra kesari shivraj rakshe felicitation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार, पोलीस गंभीर जखमी

Mouni Roy | मौनी रॉयच्या योगा पोजेसमधील फोटोजने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच बोल्ड

Sonalee Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काळ्या रंगातील साडीत दिसत आहे एकदम कडक