दौर्‍यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर जिल्ह्यातील भारसिंगीहून खापाकडे जाताना जामगावजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. शरद पवारांची गाडी या अपघातावेळी दूर असल्याने शरद पवार सुखरुप आहेत.

शरद पवार हे निवडणूकीची रणधुमाळी शांत झाल्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करत आहे. सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत आहे. दरम्यान जामगावजवळ पवारांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. या ताफ्यातील एका गाडीला एक दुचाकीस्वार जोरात येऊन धडकला. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे.

ताफ्यातील बोलेरोचा एका दुचाकी बरोबर अपघात झाला. शरद पवार यांच्या गाडीपुढे ताफ्यात 4 ते 5 वाहने होती. अचानक ब्रेक लावल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमी युवकाला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी जलालखेडच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.

अलिकडील काळात अनेक नेत्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खासदार सुजय विखे यांना सुरक्षा देणाऱ्या पोलीसांच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. पारनेरच्या गारखिंड घाटात 6 नोव्हेंबर हा अपघात झाला होता. तर दुसरीकडे 7 नोव्हेंबरला काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या गाडीला पुण्यात अपघात झाला होता. यात विश्वजित कदम थोडक्यात बचावले होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like