विजयसिंह मोहिते-पाटलांना टक्‍कर देण्यासाठी शरद पवारांनी खेळली ‘उत्‍तम’ खेळी !

सोलापूर/माळशिरस : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना विधानसभेत शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तम जानकर यांना माळशिरस मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उत्तम जानकर यांच्या उमेदवारीमुळे मोहिते-पाटील यांच्यापढे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, भाजपने उत्तम जानकर यांना फलटणमधून निवडणूक लढवण्यासीठी तयारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र राष्ट्रवादीने ‘उत्तम’ खेळी करून जानकर यांना माळशिरसमधून उमेदवारी देऊन भाजपवर पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये 14 जिल्ह्यातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, मोहोळमधून यशवंत माने तर माळशिरसमधून उत्तरमराव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

जानकर हे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. माळशिरसर विधानसभा मतदारसंघ 2009 पासून अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर जानकर यांनी 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. मागील निवडणुकीत त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जानकर यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा दिल्याने, त्यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Visit : Policenama.com