सभेतील कमी गर्दीने मोदींचा माथा तापला : धनंजय मुंडे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात पहिली सभा वर्धा येथे घेतली. या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर जोरदार हल्ला केला. पवार कुटुंबात गृहकलह असून त्यांची पक्षावरची पकड गेली आहे. पुतण्याच्या हातून शरद पवारांची हिट विकेट गेली, अशी टीका मोदींनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन पवारांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान मोदी यांनी करु नये असा सल्ला ट्विटरद्वारे दिला आहे.

ज्येष्ठ पक्षांना नेत्यांना पक्षातून काढण्यात येत असल्याचे वक्तव्य मोदींनी सभेत केले होते. यावर मुंडे यांनी, गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करुन ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे, असा पलटवार मुंडे यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील कुंभकर्ण असल्याचेही सभेत बोलले होते. याला प्रतित्युत्तर देताना मुंडे यांनी, वर्धा येथील सभेत कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जणले आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे.

Loading...
You might also like