राष्ट्रवादीनं अजित पवारांची ‘या’ पदावरून केली ‘हकालपट्टी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज (शनिवार) भल्या सकाळी राजकीय भूकंप झाला आणि त्याचा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट फोडून भाजपासोबत हातमिळवणी करून सरकारमध्ये सहभागी होती अशी कल्पना देखील कोणी केली नसेल. शरद पवार यांनी देखील अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचं सांगितलं. दरम्यान, भाजपाशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाल्यानं अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

अजित पवार हे भाजपासोबत जाणार याची कल्पना देखील कोणाला नव्हती. ते भाजपसोबत गेल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसला पार्टी अ‍ॅन्ड फॅमिली स्पील्ट असं स्टेटस ठेवलं आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि पवार कुटूंबामध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे मोठे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानं अजित पवार यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं.

त्यावर
शिक्कामोर्तब झालं आणि अजित पवार यांची शनिवारी सकाळपासुन मुंबईत चालु असलेल्या राजकीय नाटयानंतर विधिमंडळ पक्ष नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते धनंजय मुंडे हे कालपासुन नॉटरिचेबल आहेत. अजित पवार यांची विधिमंडळ पक्ष नेते हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कोणते आमदार जाणार हे आगामी काही काळात स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांची विधिमंडळ पक्ष नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

Visit : Policenama.com