राज ठाकरेंच्या सभांचा महाआघाडीला फायदा होणार का ? अजित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – जनतेचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही. आणि राज ठाकरे यांच्या सभांमुळे निवडणुकीवर चांगला प्रभाव पडेल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे. राज ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी यंदाच्या निवडणुकीत भाजपा- राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली होती. दोघांचाही टोकाचा प्रचार सुरु असल्याचे दिसून येत आहे. याबाबत विचारले असता, भाजपाने सुरुवात केली होती. आम्ही सुरुवात केली नाही. शरद पवार देशभरात फिरतात. पण शरद पवार कधी असे टोकाचे आरोप करत नाही. परंतु यावेळी शरद पवारांना असे आरोप करावे लागत आहेत. त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य होते. ५२ वर्षे आम्ही चांगले काम केले. आता जी कामी अपूर्ण आहेत ती देखील आम्हीच पूर्ण करणार. असे अजित पवार यांनी म्हंटले.

याचबरोबर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल का ? असा प्रश्नही त्यांना विचारला. त्यावेळी राज ठाकरेंच्या सभांमुळे या निवडणुकीत चांगला प्रभाव पडणार आहे. पूर्वी मोदींच्या सभेला गर्दी व्हायची, पण लोकांचा आता मोदींवर विश्वास नाही. त्यामुळे वर्धा येथील सभेला गर्दीच झाली नव्हती. आता काही लोकांना गर्दी जमवावी लागते. गाड्यांची सोय करावी लागते. असे त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, परंतु आमच्या इथे तसे काही करावे लागत नाही. असेही त्यांनी म्हंटले.