राष्ट्रवादीमधील वेगावान हलचालींबद्दल धनंजय मुंडेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर कुटूंबीयांशी चर्चा करुन पार्थ आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतील हालचालींना देखील वेग आल्याचं पाहावयास मिळत आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पक्षाच्या दिग्गज नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे आणि आमदार धनंजय मुंडे यांचा समावेश होता. दरम्यान, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अजूनही माहिती मिळाली नाही. पण बैठक झाल्यानंतर नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

त्यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘आज मी, सुनील तटकरे, आदिती तटकरे एकत्र आलो हा योगायोग नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांची सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि बिहारचे निवडणूक प्रभारी होणे हा योगायोग आहे,’ असे म्हणत मुंडे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. यावेळी मुंडे यांनी बैठकीबाबत माहिती देणं टाळलं. तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनील तटकरे यांनी बोलताना सांगितलं,’आज आम्ही बैठकीत शरद पवार यांच्याशी पार्थ पवार यांच्याबद्दल कोणत्याही विषयावर चर्चा केली नसल्याचं,’ त्यांनी म्हटलं.

आज जाहीर करणार पार्थ पवार आपली भूमिका?
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार सर्व वादावर आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. काल सिल्व्हर ओक वर सुप्रिया सुळे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पार्थ पवार कुटूंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करणार असल्याचं समजत. त्यानंतर ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like