विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, खा. सुळेंचा फडणवीसांना मिश्किल टोला

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – आमचं सरकार हे दडपशाहीचे सरकार नाही. त्यामुळे विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, विरोधकांना टीका करण्याची मुभा आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावला. निसर्ग चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी (दि.27) रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे बोलत होत्या.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत करण्यात आलेल्या युती संदर्भात केलेल्या वक्तव्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, टीका करणे हा त्यांचा अधिकार असून आमच्या सरकारमध्ये कुणालाही मनमोकळेपणे बोलण्याचा अधिकार आहे. तर आमचं सरकार हे दडपशाहीच सरकार नसून विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीसह विविध भागात कोट्यावधींची वित्तहानी व मनुष्यहानी देखील झाली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्री वादळाने अनेक घरे व शाळांचे पत्रे फटले. नाडगावमध्ये शाळेला राष्ट्रवादीकडून पत्रे वाटप करण्यात आले. यावेळी वादळग्रस्त भागाला सरकारकडून निधीची कमतरता भासणार नाही, खासदार या नात्याने सुनील तटकरे यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून केली आहे. तसेच योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.