मंत्री होताच धनंजय मुंडेंच्या अडचणीत ‘वाढ’, ‘या’ आमदारामुळे बिघडू शकते गणित

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये असलेली नाराजी पुढे यायला सुरुवात झाली आहे. शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस मधून देखील नाराजीचे स्वर उमटू लागले आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे माजलगाव मतदारसंघातील आमदार प्रकाश सोलंके हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सोलंके यांच्या नाराजीमुळे आता धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.

याच अनुषंगाने सोलंके यांच्या पुण्यातील निवासस्थानी समर्थक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यामध्ये स्थानिक पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य हे मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आमदारांच्या या राजीनाम्याचा परिणाम बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवर मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणूनच सर्व समर्थक सोलंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.

आमदार सोलंके यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा गट कार्यरत आहे त्यामुळे जर आमदारांनी राजीनामा दिला तर त्यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणावर राजीनामा देतील आणि याचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो.

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ
राष्ट्रवादीचे सर्वाधिक जि.प सदस्य निवडून येऊन देखील पंकजा मुंडेनी राजकीय खेळी करत अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवत बाजी मारली होती. यात भाजपा, शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच बंडखोर याना सोबत घेऊन पंकजा मुंडे यांनी राजकीय समीकरण जुळवले होते. मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्या आता पुन्हा ताकदीने कामाला लागतील त्यातच आमदार सोलंके यांच्या नाराजीमुळे धनंजय मुंडे यांची जिल्हा परिषदेतील ताकद कमी होऊ शकते. त्यातच बीड जिल्हा परिषदेची अध्यक्ष सभापती निवड येत्या 4 जानेवारीला होत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यावर काय मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा