मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशात ‘इंडिया’ (India) आणि ‘भारत’ (Bharat) नावावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. मोदी सरकारने (Modi Government) पाच दिवस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात संविधानातील (Constitution) ‘इंडिया’ नाव हटवणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं, अशी टीका रोहित पवारांनी (NCP MLA Rohit Pawar) ट्विटर अकाउंटवरुन केली आहे.
रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) म्हणाले, नाव बदलून प्रश्न सुटत असतील (Maharashtra Political News) तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही (Democracy) म्हणायला हवं.
NCP MLA Rohit Pawar
देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे
चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे.त्यामुळे महागाई (Inflation) ,
बेरोजगारी (Unemployment), शिक्षण (Education), दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या
चर्चेला प्राधान्य द्यावे, हे आता जनतेनेच ठरवायला हवं, असं रोहित पवारांनी म्हटलं.
मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता
मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे.
हे देखील वाचा
Tax Return Process | करोडो टॅक्सपेयर्ससाठी मोठी अपडेट, CBDT ने दिली ही माहिती; ऐकून व्हाल खुश
Hair Fall Problem | केस गळतीच्या समस्येने घाबरून जाऊ नका, आजच ‘या’ वस्तू डाएटमधून काढा बाहेर
Belly Fat Loss | पोटाची चरबी कमी करायची असेल, तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ ड्रिंक्स