‘थोर तुझे उपकार आई !’, ‘मातोश्री’च्या श्रमदानानं भारावले आमदार रोहित पवार

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन –   राष्ट्रवादीचे आमदार कोरोनाच्या संकट काळात त्यांच्या मतदारसंघात सक्रिय आहेत. सध्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा सुरू आहे. त्यामुळं त्यांनी त्यांचा मतदारसंघ कर्जत जामखेडमध्ये मोठ्या अभियनाला सुरुवात केली आहे. सार्वजनिक स्वच्छता ही सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. या स्वच्छता अभियानात रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळं भारावलेल्या रोहित पवारांनी थोर तुझे उपकार आई असं म्हटलं आहे.

सुनंदा पवार या बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. त्यांचा विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. त्यामुळंच कर्जत जामखेडमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात त्या प्रत्यक्ष सहभागी झाल्या. कार्यकर्त्यांना फक्त आदेश न देता त्यांनी स्वत: हातात खोरं टिकाव घेऊन अधिकाऱ्यांसोबत श्रमदान केलं आहे. शहरातील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेऊन संवाद साधत त्यांनी स्वच्छते संदर्भात जनजागृती केली.

रोहित पवार आईचं हे काम पाहून भारावून गेले आहेत. त्यांनी आईचे फोटो सोशलवर शेअर करत थोर तुझे उपकार आई असं म्हटलं आहे. सध्या त्यांचे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत.