मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून खा. अमोल कोल्हेंचा भाजप नेत्यांना खरमरीत टोला, म्हणाले…

ADV

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारच्या मंदिर उघडण्याच्या (temples open) मुद्यावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पण श्रद्धेच्या बाबतीत राजकारण होणे हे नक्कीच दुर्दैवी आहे. श्रेय घ्यायला पुढे येतील त्यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (mp-amol-kolhe) यांनी लगावला आहे.

खासदार डॉ. कोल्हे आपल्या जन्मगावी नारायणगाव येथे आले होते. तेव्हा ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बोलत होते. कोरोनाच्या परीक्षा पाहणाऱ्या काळानंतर थोडासा एक मोकळा श्वास घेण्याची उसंत सगळ्यांना मिळालेली आहे. त्यामुळे घरच्यांसोबतच आपण ही दिवाळी साजरी केली. पण जरी सण असला, सणाचा उत्साह असला तरी सेलिब्रेशन या झोनमध्ये जाण्याची आपली खरी मानसिकताच नाही, असे ते म्हणाले.

ADV

मंदिर उघडण्याचे महाविकास आघाडी सरकारने जे काही निर्णय घेतले ते स्वागतार्ह असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. आनंद साजरा करताना, सोशल डिस्टन्सिग, मास्कचा वापर करणे, हात धुणे ही त्रिसूत्री कायम आचरणात आणायला हवी, तेव्हा कोविडचे संकट संपेल. सण उत्सव असतील, मंदिरे उघडण्याचा सोहळा असेल या सर्व गोष्टीत हे पाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत खा. कोल्हे म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. निसर्ग चक्री वादळात द्राक्ष बागायतदारांचे जे प्रचंड नुकसान झाले जे डोळ्यांना न दिसणारे होते. ऐन घडनिर्मितीच्या काळात द्राक्ष बागांच्या बागा फेल झाल्या आहेत. त्यासाठी दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. सातत्याने बळीराजावर संकट येत राहिली आहेत. सातत्याने जो अवकाळी पाऊस सुरू होता जे नुकसान झाले आहे. त्यावर दिलासा देण्याचे मोठ काम करावे लागणार आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेबाबत कोल्हे म्हणाले की, नक्कीच ही काळजीची गोष्ट आहे. गणेशोत्सवानंतर रुग्ण वाढले होते. पुन्हा एकदा काळजी घेतली गेली पाहिजे. युरोपातील काही देशात कोरोनाची संख्या वाढतेय. आपल्याकडेही दिवाळीनंतर पुन्हा एकदा खरेदीच्या निमित्ताने लोक बाहेर पडले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही, असे पुढे आले आहे. जेणेकरून येथून पुढच्या काळात जर आपल्यात आजाराची काही लक्षण दिसत असतील, वेळेत त्याची बाधकता कमी करण्याची गरज आहे, वेळेत उपचार करण्याची आहे.