राष्ट्रवादीला अजित पवारांची ‘गरज’ असून त्यांना परत आणा, ‘या’ बड्या नेत्यानं सर्वांसमोर सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज जेवढ्या घाईने फडणवीस यांनी सरकार स्थापन केले तेवढ्या घाई-घाईत हे सरकार कोसळलं. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज झालेल्या हॉटेल ट्रायडंटमधील महाविकासआघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की राष्ट्रवादीला अजित पवारांची गरज आहे. अजित पवारांना परत पक्षात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की अजित पवार यांनी महाविकासआघाडीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी जयंत पाटलांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी त्यांनी शरद पवारांनी परवानगी द्यावी. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या अजित पवारांना पुन्हा पक्षात स्थान द्यावे अशी पक्षात मागणी आहे, याचे हे संकेत मानले जात आहेत.

अजित पवारांनी पक्षाशी फारकत घेऊन भाजपबरोबर सत्तास्थापनेत पाठिंबा दिल्या त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर बारामतीत देखील त्याचे पडसाद उमटले. अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कुटूंबातून देखील त्यांना हाक देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर बहुमत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Visit : Policenama.com