धक्कादायक ! राज्यसभेतील 16 खासदारांवर खून, बलात्कार, दरोड्या सारखे गंभीर गुन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राज्यसभेत 2020 वर्षात नव्याने आलेल्या 62 खासदारांपैकी 16 खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निवडून आलेल्या खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, या खासदारांवर न्यायालयात गंभीर गुन्ह्यांचे खटले प्रलंबित आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खून करण्याचा प्रयत्न आणि खून करण्याचा प्रयत्न आणि दरोडा सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीतील असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने विश्लेषणाद्वारे ही माहिती समोर आली आहे.
एका खासदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन खासदारांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे. यापैकी तीन खासदारांनी महिलांवरील गुन्हेगारीसंबंधित खटल्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तर एका खासदाराने बलात्काराच्या घटनेची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

भाजपच्या 18 खासदारांपैकी 2 काँग्रेसच्या 9 पैकी 3, राष्ट्रवादीचे दोन्ही खासदार, वायएसआरआयचे 4 पैकी 2 आणि बीजेडीके 25 टक्के, तृणमूल काँग्रेसचे 25 टक्के, जेडीयूचे 50 टक्के, द्रमुकचे 33 टक्के, आरजेडीचे 50 टक्के खासदार आहेत. मध्य प्रदेशातील 3 पैकी 1 खासदार, राजस्थानातील एक आणि झारखंडमधील 2 खासदरांनी त्यांच्या गुन्हेगारी नोंदी उघड केल्या आहेत.

52 खासदार कोट्याधिश

नव्याने झालेल्या खासदारांपैकी 84 टक्के म्हणजे 52 खासदार कोट्याधिश आहेत. यात वायएसआर काँग्रेसचे अलायोध्याराम रेड्डी सर्वात धनाढ्य खासदार आहेत. त्यांची मालमत्ता 25,7775,79,180 रुपये एवढी आहे. नथवाणी परिमल हे त्याच पक्षाचे सर्वात श्रीमंत खासदार आहेत त्यांची मालमतत्ता 3,9,683,96,198 रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे ज्येतिरादित्य सिंधिया यांची मालमत्ता 3,790,329,144 एवढी आहे. भाजपच्या महाराजा संजोबा लीसेम्बाकडे सर्वात कमी 5,48,594 रुपये एवढी मालमत्ता आहे. याच क्रमाने भाजपचे अशोक गस्ती यांची 19,40,048 रुपयांची मालमत्ता आहे. या क्रमवारीत तृणमूल काँग्रेसच्या अर्पिता घोष तिसऱ्या क्रमांकावर आहेत.