मानदुखीची ‘ही’ आहेत 4 कारणे, लक्षात ठेवा ‘या’ 6 महत्वाच्या गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अलिकडे सर्वच वयोगटात मानदुखीचा त्रास दिसू लागला आहे. मानदुखीचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरही सांगतात. मान हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या होते. संगणकावर काम करणे, सतत मोबाईलचा वापर आदीमुळे तरूणांमध्ये मानदुखीचे प्रमाण वाढले आहे. मानदुखीचा त्रास संपूर्ण शरीराला होतो. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मानदुखीची कारणे आणि उपाय आपण जाणून घेवूयात…

ही आहेत कारणे

मोबाईलचा अतिवापर; ज्यामुळे सारखी मान वाकलेल्या स्थितीत राहते.

2  सतत दुचाकी वाहन चालवल्याने.

सतत संगणकावर काम करणे.

खूप उंचावर असणारा संगणक किंवा खाली असलेला संगणक.

या आहेत निदान पद्धती

*  रूग्णासोबतच चर्चा करून निदान करणे.

*  गरजेनुसार एक्स-रे, एमआयआरची तपासणी करणे.

*  काही रुग्णांना ईएमजीएनसीव्ही नावाची तपासणी करणे गरजेचे असते.

हे लक्षात ठेवा

कोणतेही काम करताना मान जास्त काळ एकाच स्थितीत राहणार नाही, याची काळजी घ्या.

2  वाकून काम करताना साधारणपणे एका तासात वाकलेली मान किमान दहावेळा तरी वर करा.

मोबाईलचा वापर कमी करा.

संगणकावर काम करताना मान जास्त वर अथवा खाली वाकलेली नाही ना, हे पहा.

5  झोपताना उशी योग्य पद्धतीने घ्या.

प्रवासात मानेला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.