NEET & JEE Exam : विद्यार्थ्यांना नीट आणि जेईई परीक्षेसाठी लोकलनं प्रवास करण्यासाठी केंद्राची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    नीट आणि जेईई परीक्षेसाठी विद्यार्थी मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या लोकलनं प्रवास करू शकणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भात निर्णय घेतला आहे.

आता परीक्षार्थी मध्य आणि पश्चिम लोकल सेवेद्वारे नियोजित केंद्रांवर जाऊ शकणार आहेत. भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे याबाबत मागणी केली होती. यानंतर आता गृह मंत्रालयानं यासाठी परवानगी दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना लोकमधून प्रवास करायचा आहे त्याना परीक्षेचे प्रवेशपत्र दाखवावे लागणार आहे. यानंतर त्यांना स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थांना त्यांच्या पालकांसोबत परीक्षेच्या दिवशी लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी आता अतिरीक्त बुकिंग काऊंटर सुरू करण्यात येणार आहे.

प्रवासाच्या काळात मात्र विद्यार्थी आणि पालक असं दोघांनीही cचं पालन करणं बंधनकारक आहे. रेल्वेनं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्टेशनवर गर्दी टाळण्यासाठीही सांगण्यात आलं आहे.