सुशांतने कमवली ‘इतकी’ संपत्ती, आकडेवारी आली समोर

पोलिसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूत याने अभिनयाने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला होता. त्याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुशांतने सिनेकरिअरमध्ये जास्त प्रमाणात सिनेमे साकारले नव्हते. पण, तो एक यशस्वी अभिनेता म्हणून समोर आला होता. त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवर एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात माहीची मुख्य भूमिका साकारली होती.

सुशांत एका सिनेमासाठी 5 ते 7 कोटी मानधन घेत होता. तर जाहिरातीसाठी तो 1 कोटी रुपये घेत होता. त्याने रिअल इस्टेट प्रॉपर्टी क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. त्याची एकूण संपत्तीही 80 लाख डॉलर म्हणजे 60 कोटी पेक्षा जास्त होती. एमएस धोनी सिनेमाने 220 कोटींची कमाई केली होती. सुशांतने सिनेमे,जाहिराती आणि गुंतवणुकीतून कोट्यवधीची संपत्ती जमवली होती.

बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटीप्रमाणेच सुशांत हा वांद्रे येथील आलिशान घरात राहत होता. त्याला कार आणि स्पोर्ट्स बाईकचा छंद होता. त्यामुळे त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. यात मसेराटी क्वाटरोपोर्ते, लँड रोव्हर रेंज रोवर एसयूवी, बीएमडब्ल्यू के 1300 आर स्पोर्ट बाईक आणि इतर गाड्या आहेत. सुशांत हा मुळचा बिहारचा राहणारा होता. त्याचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी पटना इथे झाला होता. त्याची इंजीनिअर व्हायची इच्छा होती. अभ्यासातही तो हुशार होता. सुशांतने सन 2003 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया सातवे रॅकिंग प्राप्त केले होते. नंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये ( दिल्ली टेक्निकल यूनिव्हर्सिटी) मॅकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास सुरू केला होता