डायबिटीजमुळे वाढतोय अकाली मृत्यूचा धोका

पोलीसनामा ऑनलाइन – डायबिटीज हा आजार जगभरात वेगाने परसत आहे. भारतात तर डायबिटीजच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बिघडलेली लाइफस्टाइल हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे. डायबिटीज हा जास्त वयात होणारा आजार आहे असा समज होता परंतु हा समज आता चूकीचा ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीजमुळे अकाली निधनाचा धोकाही वेगाने वाढत आहे. महिला आणि मध्यम वयाच्या लोकांना हा धोका सर्वाधिक जाणवतो आहे. एका संशोधनाचा अहवालानुसार जगभरात डायबिटीजचे सर्वात जास्त रुग्ण भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहेत.

वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशन माहितीनुसार सध्या भारतात सुमारे ६ कोटी २० लाख लोक डायबिटीजने पीडित आहेत. पुढील ५ ते ६ वर्षात म्हणजेच २०२५ पर्यंत ही आकडेवारी ७ कोटीपर्यंत जाऊ शकते. अमेरिकेतील एका संशोधनानुसार, जगभरातील खासकरुन आशिया महाद्वीपमध्ये लोकांची लाइफस्टाइल बदलत आङे आणि त्यांच्यात वेगाने लठ्ठपणा वाढत आहे. ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांमध्ये अकाली मृत्यूचा धोका वाढला आहे. या संशोधनासाठी भारतासह चीन आणि बांग्लादेशसारख्या देशांतील लोकांचा समावेश करण्यात आला होता.

साधारण १० लाख लोकांच्या जीवनशैलीचे १२ वर्ष निरीक्षण करण्यात आल्यानंतर असे दिसून आले की, डायबिटीजमुळे मृत्यूचा धोका साधारण दुप्पट वाढला आहे. तसेच डायबिटीजमुळे अकाली मृत्यूची प्रकरणे महिलांसोबतच मध्यम वयाच्या रुग्णांमध्येही जास्त दिसत आहेत. डायबिटीजपासून दूर राहायचे असल्यास व्यायाम नियमित केला पाहिजे. व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि इतरही फायदे होतात. दरारोज ३० मिनिटे शारीरित हालचाल करण्याचे अनेक फायदे होतात. तसेच पोषक आहार घ्यावा. पोष्टीक कडधान्य, फळे आणि भाज्यांचा आहारात भरपूर समावेश करावा. प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूड खावू नये. मद्यसेवन, धुम्रपान बंद करावे. धुम्रपान करणारांना मधुमेहाचा जास्त धोका असतो.