‘न्यूझीलँड’हून भारतात लग्नासाठी आलेल्या महिलेचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्यानं प्रचंड ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत पहाडगंज भागात एका परदेशी महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पहाडगंजच्या एका हॉटेलमध्ये आज म्हणजेच शनिवारी न्यूझीलँडच्या एका महिलेचा मृतदेह मिळाला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना पहाडगंजच्या ताशकंद हॉटेलमध्ये घडली. या महिलेचे वय 49 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. ही आपल्या पतीसह हिंदू परंपरेनुसार लग्न करण्यासाठी भारतात आली होती. प्राथमिक तपासात ह्दयविकाराने महिलेचा मृत्यू झाला अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याआधी मंगळवारी दिल्लीत अलीपूर भागात एका ओयो हॉटेलच्या खोलीत एका महिलेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले होते. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता फोनच्या माध्यमातून ओयो हॉटेलमध्ये एका खोलीत एक महिला बेशुद्ध अवस्थेत दिसल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. यात 33 वर्षीय महिलेला रुग्णालयात हलवण्यात आले परंतू तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृत महिला दिल्लीच्या खेरा कला भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ओयो हॉटेलच्या खोलीची बुकिंग महिला आणि तिच्यासह हॉटेलमध्ये थांबलेल्या आरोपी विक्की मान याच्या नावावर होती. आरोपी अलीपूरचा रहिवासी आहे.

दोघे एक दिवसापूर्वी आरोपीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आले होते.दोघे खोलीत दारु पित होते या दरम्यान दोघात वाद झाला. वादा दरम्यान आरोपीने पीडित महिलेच्या गळ्यावर हल्ला केला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि आरोपी तेथून फरार झाला. अलीपूरच्या एसएचओ निरीक्षक सुनील कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like