पाठवणीच्या वेळी आईनं दिला नवरीला ‘सल्ला’, म्हणाली – ‘खोटं-खोटं तरी रड’, 30 लाख लोकांनी पाहिला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल टिकटॉकचा वापर हा प्रत्येकजण प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत आहे. टिकटॉक वर नवीन व्हिडिओ हे सतत व्हायरल होत असतात. टिकटॉक वरती कोणाला केव्हा प्रसिद्धी मिळेल हे काही सांगतात येत नाही. प्रत्येक लग्नामध्ये आपण पाहतो, नववधू माहेर सोडून जात असताना रडत असते, तसाच एक वधूचा माहेर सोडून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती चांगलाच व्हायरल झाला आहे. ती वधु पाठवणीच्या वेळी इतर नववधू प्रमाणे न रडता हसताना दिसत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://www.tiktok.com/music/original-sound-Raashii-Chanda-6798472588105435906?referer_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fnewly-married-girl-laughing-when-her-mother-is-crying-on-her-bidai-funny-video-went-viral-on-tiktok-mhjb-439555.html&referer_video_id=6798494213202824449

आजच्या काळात नववधू कशी असेल आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो. व्हिडिओ मध्ये मुलीची सासरी पाठवणी चालू आहे, त्यामध्ये तिच्या आईला अश्रू हे अनावर होत आहेत, मात्र तिच्या डोळ्यात पाण्याचा थेंब ही दिसत नाही. त्यावेळी तिला कुणीतरी सांगतं की तिची आई खूप रडते आहे. जेव्हा ती मागे वळून आईकडे पाहते, तेव्हा खूप हसू लागते. तर तिला आई म्हणते की, ‘अगं खोट तरी रड’ आणि या व्हिडीओतील नववधू आईला खोटं रडून देखील दाखवते. तेव्हा ती आईला सांगते मी इथेच आहे, तू केव्हा ही येऊ शकतेस.

सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत 30 लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 3 लाख जणांनी लाईक केला असून 1300 हून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.