‘वायबी’ सेंटरबाहेर राष्ट्रवादीच्याच कार्यकत्यांकडून अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही दोन गटात विभागले आहेत. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ तर अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेच तसेच हा पवार कुटुंबियही अस्वस्थ झाले आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशा आशयाचं ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होत.

त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पक्ष आणि घरात फूट पडल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही अजित पवार यांनी शरद पवार यांची फसवणूक केली आहे अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राबाहेर अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत.

अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र देत पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com