रुग्णाच्या नातेवाइकांची आकुर्डी येथील हॉस्पिटलमध्ये तोडफोड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – रुग्णाच्या नातेवाइकांनी गोंधळ घालत आकुर्डी येथील टोणगांवकर हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. हि घटना गुरुवारी (१२ डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
या प्रकरणी आक्रम सिद्दीक शेख (३८, रा.दत्तवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. तर, तालीब (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) वय अदांजे २५ ते ३० आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोणगांवकर हॉस्पिटलमध्ये शेख यांच्या तोंड ओळखीचे रुग्ण अब्दुल गनी चौधरी हे अ‍ॅडमीट होते. आरोपी हे त्यांचे नातेवाईक असून, त्यांनी हातात दांडके घेत रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयाच्या प्रवेशदाराची काच फोडत ३० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/