कचऱ्याची गाडी उभी न केल्याने मनपा कर्मचार्‍यांना बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत कचरा गाडीवरील दोन कर्मचाऱ्यांना आज (दि.९) मारहाण करण्यात आली केडगाव उपनगरातील भूषणनगर येथे ही घटना घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात मिलिंद मुकुंद कुलकर्णी (रा.भूषणनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेबाबत कर्मचारी जालिंदर बोरगे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, घरासमोर कचऱ्याची गाडी उभी न केल्याने कुलकर्णी यास राग आला. त्याने घनकचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वादातून हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वीच शहर अभियंत्यांवर बूट फेकण्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच महापालिकेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीबाबत मनपा कामगार युनियन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like