बीड : भावी पत्नाची खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

माजलगाव/बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भावी पत्नीचा खून करून पुरवा नष्ट करणाऱ्या आरोपी पतीला माजलगाव येथील अप्पर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद एस. वाघमारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोनाली उर्फ रिंकु मोतीराम नाईकनवरे (वय-16) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रशांत गणेश खराडे (वय-26 रा. सावरगाव ता. माजलगाव) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील सोनाली उर्फ रिंकु नाईकनवरे हिचा धारुर घाटातील बन्सीवाडी शिवारात खून केला. सोनालीचे वडील मोतीराम नाईकनवरे यांनी मुलीचे अपहरण करुन खून केल्याची तक्रार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे आरोपी प्रशांत खराडेवर दाखल करण्यात आले.

गुन्ह्याची थोडक्यात हकिकत अशी की, 9 जानेवारी 2017 रोजी दुपारी सोनालीचे डोके दुखत असल्याने माजलगाव येथील रुग्णालयात आजीसोबत गेली होती. याचवेळी प्रशांत खराडे तेथे आला. त्याने सोनालीला घेऊन धारुर घाडातील बन्सीवाडी शिवारात ओढ्याच्या कडेला निर्मनुष्य ठिकानी नेले. त्याठिकाणी तिचा ओढणीने गळा आवळून धारदार दगडाने गळ्यावर मारून खून केला. तसेच तिचाच मोबाईल बंद करुन सिदफणा नदीच्या फुलाखील फेकून दिला. प्रशांतच्या शर्टावर रक्ताचे डाग पडल्याने त्याने ते डाग पाण्याने धुवून शर्ट लपवून ठवेला.

या गुन्ह्याचा तपास माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे हे तपास करत असताना नातेवाईकांनी आरोपी प्रशांतवर आरोप केला. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. हरी बालाजी यांनी उर्वरीत तपास करून गुन्ह्याचे दोषारोप पत्र माजलगाव अप्पर सत्र न्यायालयात दाखल केले.
याप्रकरणात सरकार पक्षातर्फे 21

Visit : Policenama.com