थोरात यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेस देणार विखेंना ‘शह’ ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद देऊनही मुलाच्या खासदारकीसाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचे ठरविल्याची चर्चा आहे. थोरात यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास विखे-पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे.

काँग्रेस पक्षाने विखे पाटील कुटुंबीयांना ताकद दिली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. तसेच त्यांच्या पत्नीला नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. असे असताना मुलगा सुजय विखे याला लोकसभेच्या उमेदवारीची माळ गळ्यात न पडल्यामुळे विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुलगा सुजय विखे यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. सुजय विखे यांना खासदारकी मिळाली. राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाने गृहनिर्माण मंत्रीपद दिले होते.

विखे पाटील कुटुंबीयांना काँग्रेस पक्षाने नेहमीच ताकद देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलासाठी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विरोधी पक्षनेतेपदासारखी महत्त्वाची पद देऊनही विखे पाटलांनी पक्ष बदलल्यामुळे काँग्रेसने पक्षातील त्यांचे परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. आता प्रदेशाध्यक्ष थोरात यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचे नियोजित आहे अशी चर्चा आहे. थोरात यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन विखे पाटील यांना राजकीय शह देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांचे परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात यांना विखे-पाटील यांचा मोठा धक्का बसणार आहे.

Visit : Policenama.com