मनाचा व्यायाम गरजेचा : डॉ. दत्ता कोहिनकर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – “आशा प्रतिष्ठान ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या” वतीने म ए सो भावे हायस्कूल पेरुगेट पुणे येथे बुधवारी दिनांक 5/2/2020 रोजी मधील इयत्ता 10 च्या विध्यार्थी मित्रांसाठी परीक्षेला सामोरे जाताना प्रसिध्द व्याख्याते आणि मनाची मशागत कार लेखक श्री डॉ. दत्ता कोहिनकर सर यांचे “मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
 Dr. Datta Kohinkar
या वेळी डॉ कोहिनकर सर म्हणाले की आयुष्याच्या प्रत्येक परिक्षे साठी निरोगी, सबल शरीर आणि मन असणे अत्यंत आवश्यक आहे. निरोगी शरीरा साठी रोज व्यायाम करणे, योग्य आहार, विश्रांती तसेच सुदृढ मनासाठी ध्यानधारणा करणे, अंतर्मनची शक्ती वाढवणे आवश्यक आहे तसेच नवीन तंत्रज्ञान चा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

परीक्षेची भीती मनातून कशी घालवावी, फार तणावाखाली न जाता अभ्यास कसा करावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन आणि प्रात्यक्षिकं दाखवून मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत डॉ. कोहिनकर सरांनी खूपच सुंदर मार्गदर्शन केले, ज्यामुळे मुलांचा उत्साह, आत्मविश्वास वाढल्याचे विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.

यावेळी सरांचा शाळे तर्फे फुलांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आहे याप्रसंगी भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. प्रा. भारमळ सर, पर्यवेक्षक मा. प्रा. पाटोळे सर, सौ. खिरीड मॅडम, आशा प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष श्रीमती लोणकर मॅडम, उपाध्यक्ष श्री गणेश ठाकर, खजिनदार श्री पुरुषोत्तम डांगी, विश्वस्त डॉ. तांदळे सर, श्री प्रतीक डांगी, श्री शिंदे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम ची प्रस्तावना सौ खिरीड मॅडम यांनी केली तर आभार पुरुषोत्तम डांगी यांनी केले.