गोमती चक्राचे ‘हे’ फायदे, बदलू शकतात तुमची Life, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन  – जीवनात यश मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी व्यक्ती मेहनत करत असतो. परंतु, अनेकदा मेहनत करूनही यश मिळत नाही, यास तो व्यक्तीच कारणीभूत असतो. यामुळे त्याच्या जीवनात निराशा निर्माण होते. आज ज्योतिष शास्त्रात सांगितलेले असे उपाय आपण जाणून घेणार आहोत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही जीवनातील समस्या दूर करू शकता.

हे गोमती चक्राचा वापर केल्यास शक्य आहे. हे समृद्धी, आनंद, चांगले आरोग्य, धन, मनाची शांती देते आणि वाईट प्रभावापासून वाचवते. रोगावरील उपचार, चांगली भक्ती, समाजात प्रतिष्ठा, आर्थिक विकास, एकाग्रता, व्यापार वृद्धी आणि पूजेची शक्ती देण्यात याचा उपयोग होतो.

याचा उपयोग एका यंत्राच्या रूपात केला जातो. जर विश्वासने याचा उपयोग केला तर यश नक्की मिळते. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात आणि कामात यश मिळत नसेल तर अभिमंत्रित गोमती चक्र, चांदीच्या तारेत एकसोबत बांधून आपल्या खिशात ठेवा. याच्या प्रभावामुळे यश प्राप्त करू शकता.

धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्र घ्या आणि घरातील पूजा स्थानात लाल रेशमी वस्त्र ठेवून त्यावर सर्व गोमती चक्र ठेवा. सर्वप्रथम त्यास चंदनाच्या अत्तराचा टिळा लावा. नंतर निरांजनाने ओवाळा. स्फटिकाच्या माळेने 11 माळा श्री महालक्ष्म्यै श्रीयें नम: चा जप करा. जप केल्यानंतर उठून सर्व गोमती चक्र त्याच लाल वस्त्रात तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्य ठिकाणी ठेवा. यानंतर तुम्हाला आर्थिक लाभ होण्यास सुरूवात होईल.

You might also like