इंदापूर नगरपरिषदेचे अनाधिकृृत स्वच्छता बॅनर देताहेत अपघाताला ‘निमंत्रण’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर नगरपरिषद प्रशासकीय अधिकार्‍यांनी शासकिय नियमांना तिलांजली वाहून स्वत:च्या मनमानी कारभाराने इंदापूर शहरातील जुने पुणे-सोलापूर हायवे रोड, ना.रा. हायस्कुल परिसर, महाविद्यालय परिसर, बाबाचौक, शंभरफुटी रोड, चाळीसफुटी रोड, मुख्यबाजारपेठ, संभाजी चौक, श्रीरामवेस-अकलुज नाका, बस स्थानक परिसर, खडकपुरा इत्यादी गजबजलेल्या मोक्याच्या ठिकाणी वाहतुकीला, पादचार्‍यांना व शालेय विद्यार्थ्यांना रहदारीला अडथळा निर्माण होइल अशा पद्धतीने भर रस्त्यावर व फुटपाथच्याही आतमध्ये मोठमोठे स्वच्छता संदेश देणारे बॅनर (कटाउट) शासकिय नियम बासनात गुंडाळून अनाधिकृृृतपणे जाहिरातबाजीसाठी लावल्याने इंदापूर नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी व संबधीत विभागाचा अनागोंदी व मनमानी कारभार संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

निर्ढावलेल्या व मनमानी अधिकार्‍यांच्या बेताल कारभारामुळे नागरिक, विद्यार्थी व पादचारी यांना रस्त्याच्या कडेने चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यातील बॅनरच्या अडथळ्यांमुळे छोटे मोठे अपघातही वारंवार घडत आहेत. परवा ना. रा. हायस्कुलसमोरील अनधिकृृृतपणे रस्त्यावर लावलेल्या नगरपरिषदेच्या स्वच्छता बॅनरच्या अडथळ्यामुळे व रहदारीला अपघात होऊन स्वारगेट-सोलापूर शिवशाही बसचा दोनचाकी मोटारसायकलला धक्का लागुन अपघात झाला. विनाकारण बस ड्रायव्हरला नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊन मार खाण्याची वेळ आली.

दुखापत झाली नाही परंतु अडथळ्यांमुळे वारंवार घडणारे अपघातात एखाद्याला जिवानीशी मुकावे लागल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकातुन उपस्थित केला जात आहे. कुंपणच शेत खात असल्याने तक्रार करायची कुणाच्या विरोधात व कुणाकडे करायची हा मोठा प्रश्न सध्या सर्वांनाच सतावत आहे. परंतु नगरपरिषद संबधित विभागाचे अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेवुन गाढ झोपी गेले असल्याने शहरातील वाहतुकीला ठरणारे अडथळे हे नागरीकांच्या जिवावर बेतत आहेत. तर नगरपरिषद मुख्याधिकारी हे आठवड्यातुन चार-चार दिवस कार्यालयात हजर राहात नसल्याने त्यांना अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याचे कारण सांगुन कानावर हात ठेवण्याची भुमिका बजावत आहेत.

Indapur

इंदापूर शहरात अतिक्रमणाने उच्छाद गाठला असुन शहरात सर्वत्र सार्वजनिक रहदारीच्या ठीकाणी अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. तर शहरातील जुना पुणे-सोलापूर हायवे रोडवरील बाबा चौक ते आय काॅलेज या परिसरातील पादचारी फुटपाथ मार्ग पूर्णपणे अतिक्रमणाने वेढल्याने गुदमला असुन त्यांना मोकळा श्वास कधी मिळेल याचे उत्तर सध्या झोपेचे सोंग घेतलेला नगरपरिषद अतिक्रमण विभाग व जनतेने जनतेच्या कामासाठी निवडून दिलेले सत्ताधारी व विरोधातील लोकप्रतिनीधी हे दररोज नगरपरिषदेत जनतेच्या कामकाजासाठी कार्यालयात उपस्थित राहिले तरच देऊ शकतील.

इंदापूर शहरात झपाट्याने वाढलेले बेसुमार अतिक्रमण व वाढती लोकसंख्या आणि वाढत्या रहदारीचा विचार केल्यास इंदापूर शहरात सुविधांचा विकास होणे अत्यत गरजेचे असताना नगरपरिषदेचे अधिकारी मात्र निर्ढावलेपणाणे शासनाचे नियम पायदळी तुडवुन मनमानी कारभाराने जनतेच्या हितासाठी बनविलेला कायदा स्वत:च मोडुन मन मानेल त्या पद्धतीने वाट्टेल तसे काम करतात याचे मात्र आश्चर्य वाटते. आता तरी नगरपरिषदेच्या संबधीत विभागाने यातुन बोध घेवुन आपली चुक सुधारण्याचा प्रयत्न करावा. लोकांना नियम दाखविणार्‍यांनी अगोदर स्वत: नियमांचे पालन करावे. नगरपरिषदेने नियमांचे अनधीकृृृृत बॅनर हटवावेत अन्यथा या अधिकार्‍यांना जनतेने कायदा शिकविण्याची पाळी येऊ नये अशी सर्वसामान्य नागरीकांतून मागणी जोर धरत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/