आई-वडिलांनी मुलांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची आवश्यकता : IPS डॉ. रवींद्र कुमार सिंघल

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – आई वडिलांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी कळंब येथे मंगळवारी (दि 7) रोजी आयोजित पोलीस जनता दरबारात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना सिंगल म्हणाले की, आई वडीलांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे. तसेच मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात त्याला करीयर करण्याची मुभा द्यावी. मुलांना आई वडीलांच्या विचाराच्या चौकटीत बांधून ठेवू नका त्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी स्वातंत्र्य द्या असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस प्रशासन करत असलेल्या कामात जनतेचे सहकार्य असेल तर पोलीसांना करत असलेल्या कामाचे समाधान लाभते. वाईट प्रवृत्ती ही सर्वच प्रशासकीय विभागात असतात त्यांना संपविण्यासाठी सर्वाचेच प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस हा एकटा सेवा करत नसतो तर संपूर्ण कुटुंब त्याची सेवा करत असते हे पण सर्वानी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

ग्रामीण भागात पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्तीचे सदस्य, गारमसुरक्षा दलाने समन्वयाने काम केल्यास गावात शांतता नांदेल त्यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकाश भडंगे, स्नेहा चंदनशिव, शिवाजी गायकवाड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांनी केले यावेळी तालुक्यातून पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे सदस्य, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, शांतता कमेटी सदस्य, शहरातील नागरीक, विध्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थीत होते.

यावेळी कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व कळंब पोलीस ठाण्याच्या वतीने ईटकूर येथील शहीद जवान मधुकर दशरथ जगताप यांच्या विर पत्नी सरस्वती मधुकर जगताप व सध्या जमू काश्मीर येथे हसेगाव (के) येथे कर्तव्य बजावत असलेले रामहरी ज्ञानेश्वर यादव यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीसांना उत्कृष्ट सहकार्य करणारे पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळे, समाजसेवक, पत्रकार संघ, गारमसुरक्षा दल यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला व ग्रामसुरक्षा दलाला साहीत्य वाटप करण्यात आले. तसेच पोलीस दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या व सहभागी संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/