भिवडी येथील आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक स्मारकाची दुरावस्था

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचे मुळगाव असणाऱ्या भिवडी येथे सुसज्ज स्मारक उभारण्यात आले. नुकतेच त्याचे उद्घाटन दिमाखदारपणे करण्यात आले. परंतु एक वर्षाच्या आतच या स्मारकामध्ये जनावरांचे गोठे, दारूच्या बाटल्या, वाहणे बेकायदेशीररित्या पार्किंग केली जात असल्याचे समोर आले आहे.

या स्मारकामध्ये दारूच्या बाटल्यांचा मात्र प्रचंड खच झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भिवडी (ता पुरंदर) येथे येथील स्मारकाला वॉल कंपाऊंड करण्यात आले. मात्र या स्मारकावर कोणाचे नियंत्रण नसल्याने येथील परीसर सुशोभित ठेवण्या ऐवजी दारुड्यांचा आड्डा बनत चालल्याने राज्यभरातून येणारे अनुयाई यांनी मात्र तीव्र शब्दात असंतोष व्यक्त केला आहे. या स्मारकामध्ये असणाऱ्या शौचालयाच्या दरवाजाची देखील तोडफोड केली असल्याने येथे येणाऱ्या अनुयायांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंबंधी बहुजन हक्का परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी तहसीलदार रूपाली सरनोबत यांना नुकतेच एक निवेदन दिले आहे.

या संदर्भात बहुजन हक्क परिषद यांच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. सदरच्या स्मारकामध्ये सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात यावी. तसे न झाल्यास आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊन असे सुनील धिवार यांनी सांगितले. यावेळी परविणताई पानसरे, संतोष डुबल, ॲड यशोदाभूषण कुंभारकर, कैलास धिवार, नाना मदने, संदीप जगताप, बापू माने, अविनाश भोसले, आण्णा भांडवलकर, धनु भांडवलकर, गणेश भोंडे, आदी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/