राष्ट्रवादीच्या आ. संग्राम जगतापांना धक्का ; जि. प. सदस्याकडून भाजपचा प्रचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य कोमलताई महेंद्र वाखारे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेऊन भाजप उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना मोठा धक्का बसला आहे.

वाखारे यांनी आजपासून भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याचा मोठा फटका आमदार संग्राम जगताप यांना बसणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असूनही आमदार राहुल जगताप यांच्या बालेकिल्ल्यातच वाखारे यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन भाजप उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे येळपणे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला मोठा फटका बसेल, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.

वाखारे यांना भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हा निर्णय आ. संग्राम जगताप यांच्यासह श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांना मोठा धक्का देणार आहे.