पुण्यात खा. सुप्रिया सुळे आणि महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांना पराभुत करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या घरी बैठक घेवुन प्लॅनिंग करणारे चंद्रकांत पाटील यांची अचानकपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी भेट झाली. निमित्‍त होते ते भोर तालुक्यातील बांडेवाडी येथील यात्रेचे. खा. सुळे आणि मंत्री पाटील हे समोरा-समोर आले आणि त्यांनी एकमेकांना नमस्कार केला.

योगायोगाने खा. सुळे आणि महसुल मंत्री पाटील यांची भेट झाली. खा. सुळे आणि मंत्री पाटील यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा होता. दोघांनी एकमेकांना नमस्कार घातल्याचे पाहुन कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. बारामती लोकसभा मतदार संघातुन भाजपाने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने स्थानिक उमेदवाराला उमेदवारी दिल्याने दौंड आणि परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. खा. सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यात काटे की टक्‍कर होणार हे आता निश्‍चित झाले आहे. दरम्यान, खा. सुळेंच्या पराभवासाठी वेगवेगळी वक्‍तव्ये मंत्री पाटील यांनी यापुर्वी अनेक वेळा केली आहेत. एवढेच नव्हे तर खा. सुळेंच्या पराभवासाठी पाटील यांनी पुण्यातील खासदार संजय काकडे यांच्या घरी काही दिवसांपुर्वी बैठक घेवुन प्लॅनिंग देखील केले होते. मात्र, आज अचानकपणे खा. सुळे समोर आल्यानंतर काही क्षणासाठी पाटील स्तब्धच राहिले.