न्यायालयाच्या आवारातच राव यांना ‘भोवळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेले ज्येष्ठ कवी पी. वरवरा राव यांना बुधवारी सुनावणीवेळी न्यायालयात आणल्यानंतर त्यांना चक्कर आल्याची घटना घडली. न्यायालयाच्या परवानगीने तात्काळ त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू
बुधवारी खटल्याच्या कामानिमित्ताने न्यायालयात हजर केले होते. वरवरा राव यांना रात्रीपासूनच पोटात दुखत होते. त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले, त्याही वेळी देखील त्यांच्या पोटात दुखत होते. परंतु, त्यांना गाडीतच चक्कर आली. याची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने त्यांना तात्काळ ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे बचाव पक्षाचे वकील पार्थ शहा यांनी सांगितले.

दरम्यान, मागील सुनावणीवेळी तीन क्लोन कॉपी दिल्या होत्या. त्या सायबर एक्सपर्टला दाखविल्या असून, त्यातील दोन क्लोन कॉपी रिकाम्या आढल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. न्यायालयाने त्या क्लोन कॉपी जमा करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

Visit : policenama.com