Petrol-Diesel Price : ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात ‘किरकोळ’ घसरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लागोपाठ घसरण होत असल्याचे दिसत आहे. तर आज बुधवारीसुद्धा राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात किरकोळ घसरण झाली. दिल्लीत पेट्रोल 71.94 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

मुंबईत पेट्रोल 77.60 रुपये आणि कोलकातामध्ये 74.58 रुपये प्रति लीटर आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोल 74.73 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

तर, डिझेलबाबत बोलायचे तर आज दिल्लीत डिझेल 65.23 रुपये प्रति लीटर दराने विक्री होत आहे. मुंबईत डिझेल 68.36 रुपये आणि कोलकातामध्ये 67.59 रुपये प्रति लीटर आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये आज डिझेल 68.89 रुपये प्रति लीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 78.85 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 69.29 रुपये प्रति लीटर आहेत.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता.