पुरंदर तालुक्यातील ‘पिंगोरी’ येथे भारतातील दुसरा ‘उलूक’ उत्सव

जेजुरी – पोलीसनामा ऑनलाइन : (संदीप झगडे) : येत्या २९ नोव्हेंबरपासून २ डिसेंबर या कालावधीत पुणे येथे जागतिक घुबड परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना घुबडाविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने इला फौंडेशनच्या वतीने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे निसर्गाच्या सान्निध्यात भारतीय दुसरा उलूक उत्सव दि. ३ व ४ डिसेंबर रोजी आयोजित केला असून, या उत्सवासाठी तेरा देशांतील घुबडावर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती फौंडेशनचे समन्वय राजकुमार पवार यांनी दिली.

इला फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या उलूक उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. गेल्या वर्षीच्या उत्सवा वेळी पंधरा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. घुबड हा मानवासह शेतकऱ्यांचा मित्र आहे. घुबडा बद्दल समाजात मोठ्या अंधश्रद्धा व चुकीचे गैरसमज आहेत. भारतात घुबडांच्या ४२ प्रजाती आढळत असून त्यांची संपूर्ण माहिती सर्वाना व्हावी या हेतूने उलूक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

घुबड हा निशाचर, शिकारी पक्षाच्या जीवनाच्या सर्वांगीण पैलूंचा अनेक वर्षे सोळा देशातील संशोधक पुणे येथे होणाऱ्या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत. पुणे येथे होणारी हि जगातील सहावी परिषद आहे. इला फौंडेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हि परिषद होत असल्याचे फौंडेशनचे प्रमुख व परिषदेचे संयोजक डॉ सतीश पांडे यांनी हि माहिती दिली. भारतात घुबड या पक्षा भोवती अघ्पही अंधश्रद्धांचा विळखा असून दरवर्षी चुकीच्या समजुतीमुळे व तस्करीमार्गे ७८ हजार घुबडांची हत्या होते.

निसर्गचक्रातील महत्वाचा दुवा असणाऱ्या आबू शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या घुबडाबद्दल समाजात संवेदनशील जाणीव आणि निकोप दृष्ट्रीकोन वाढण्याची गरज आहे. घुबडांविषयी शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. आऊल्स ऑफ द वल्ड या ग्रंथाचे लेखक व शास्त्रज्ञ जेम्स डंकन पुणे येथील परिषदेत सहभागी होवून मार्गदर्शन करणार आहेत असेही डॉ. पांडे यांनी सांगितले. उत्सवासाठी ज्या शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे त्यासाठी तयार केलेले कलाकृती दि २० पर्यंत जमा कराव्यात असे आवाहन राजकुमार पवार यांनी केले आहे.

Visit : Policenama.com