जुन्या पेन्शनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार रोहित पवार, कळंबच्या कार्यकारिणीला दिलं आश्वासन

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या पेन्शनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे कळंब कार्यकारणीला ठाम आश्वासन. आज कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे कळंब (जि.उस्मानाबाद) दौऱ्यावर आले असता कळंब कार्यकारणीच्या वतीने त्यांना निवेदन देऊन धावती चर्चा करण्यात आली. यावेळी माननीय आमदार महोदयांनी पूर्ण निवेदन वाचून कार्यकारिणीला हा प्रश्न मी विधानसभेमध्ये नक्की मांडणार आहे, ठाम असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा मुख्य संघटक प्रशांत घुटे, कार्याध्यक्ष सुनील बोरकर, सरचिटणीस मोहन सोनटक्के,कळंब तालुका अध्यक्ष नारायण बाकले तालुका संघटक कालिदास वनवे, केंद्र संघटक अशोक आंधळे, विशाल पवार यांच्यासह अनेक डीसीपीएस धारक बांधव उपस्थित होते.