मोरगाव येथील व्यक्तीची आत्महत्या

पुरंदर : पोलीसानामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथील डोंगराची आई मंदिरात मोरगाव येथील पोपट सर्जेराव तावरे ( वय- ५७ ) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मोरगाव जवळील चोपन वस्ती येथे राहणारे पोपट सर्जेराव तावरे हे सतत आजारी होते. सोमवारी ( दि.८) मेडिकल स्टोअरमधून औषधे घेऊन येतो असे सांगून ते घरातून निघून गेले ते परत आले नाहीत. म्हणून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मंगळवारी ( दि.९) कोळविहीरे गावाच्या हद्दीतील डोंगरची आई मंदिराच्या सभा मंडपात त्यांचा मृतदेह आढळून आला.

तावरे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले . या प्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बाळासाहेब कदम तपास करीत आहेत.