आमदार टिळेकरांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण मी चव्हाटयावर आणली, त्याचा चेतन तुपेंकडून वापर पण सभागृहात मुग गिळून गप्प होते ? : मनसेचे वसंत मोरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार योगेश टिळेकर यांनी येवलेवाडी विकास आराखडा, कचरा प्रकल्प, कात्रज – कोंढवा रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याची प्रकरण मी चव्हाट्यावर आणली. या विरोधात मी महापालिका सभागृह आणि सभागृहाबाहेर आंदोलन करत असताना विरोधी पक्षनेते असलेले चेतन तुपे – पाटील गप्प बसले होते. परंतु आज निवडणुकीचे उमेदवार म्हणून ते मी काढलेल्या योगेश टिळेकर यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा प्रचारासाठी वापर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जरी त्यांच्यासोबत असले तरी त्यांचे सर्व कार्यकर्ते आज निवडणुकीत माझ्यासोबत आहेत, असा हल्ला मनसेचे हडपसर विधानसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी केला आहे.

वसंत मोरे पोलीसनामा च्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, की मी कात्रजचा विकास केला आहे. वाहतूक, कचरा आणि पाणी विषयावर मी मागिल 15 वर्षात मोठे काम केले आहे. परंतु उर्वरित मतदारसंघामध्ये या समस्या आजही कायम आहेत. मागील 10 वर्षातील आमदारांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे हडपसर, मगरपट्टा सिटी, एनआयबीएम, कोंढवा आणि त्या परिसरात आजही मोठ्या प्रमाणावर पाणी, वाहतुकीची कोंडी आणि कचऱ्याची समस्या आहे.

विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी मागील पाच वर्षात केवळ भ्रष्टाचार केला आहे. येवलेवाडी विकास आराखड्यात स्थानिक भूमीपुत्रांच्या जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डरांकडून मोठ्या रकमा आणि गाडया घेतल्या आहेत. ही प्रकरण मी उघडकीस आणली. स्वतःच्या माणसाला काम मिळावे आणि मलिदा खाता यावा यासाठी कात्रज कोंढवा रस्त्याच्या निविदा फुगवून आणल्या होत्या. हडपसर परिसरात कचऱ्याचे प्रकल्प आणून हडपसरचा कचरा डेपो केला आहे. यातही मोठा हात मारला आहे. यासह आमदारांची अनेक प्रकरण मी बाहेर काढली. राज्य शासनाला त्याची दखल घ्यावी लागली.

या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर मी महापालिका सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आंदोलन आणि पुराव्यानिशी तक्रारी केल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार चेतन तुपे – पाटील याच प्रकरणांचा प्रचारासाठी वापर करत आहेत, ही चेष्टाच आहे. ही प्रकरण सभागृहात मांडत होतो त्यावेळी चेतन तुपे – पाटील पालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यांनी या प्रकरणांवर विरोधक म्हणून जो आवाज उठवणे गरजेचे होते, तो उठविला नाही. आता त्याच विषयांचा प्रचाराचा मुद्दा करत आहेत, हे हास्यास्पद आहे. मला वाटतं या मुद्द्यांवरून पाटील माझाच प्रचार करत आहेत. भले त्यांचे नेते पाटील यांच्यासोबत असतील तरी कार्यकर्ते माझ्या बाजूने उभे आहेत, असा टोला ही मोरे यांनी पाटील यांना लगावला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like