मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मौजमजा आणि व्यसनासाठी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट 4 ने मुसक्या आवळल्या आहेत. येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रामा पापा जाधव (वय-24 रा. देहूरोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.15) बालेवाडी येथील ज्युपीटर हॉस्पीटलजवळ करण्यात आली.

आरोपीने ऑगस्ट 2018 मध्ये येरवडा येथे घरफोडी केली होती. गुन्हा केल्यानंतर तो एक वर्षापासून फरार होता. याप्रकरणी सचिन उदय राठोड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार रामा जाधव हा ज्युपीटर हॉस्पीटलजवळ येणार असल्याची माहिती युनिट 4 चे पोलीस शिपाई रमेश राठोड, सागर घोरपडे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी रामा जाधव याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी रामा जाधव याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने येरवडा येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने हा गुन्हा त्याचा साथिदार अक्षय बाळू सोनवणे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्या मदतीने केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून 5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या चैन असा एकूण 3 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ, पोलीस हवालदार राजु मचे, पोलीस शिपाई रमेश राठोड, सागर घोरपडे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like