निखील गुप्ता औरंगाबाद शहराचे नवे पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद यांची बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. आज औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी निखील गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल गुप्ता हे केंद्रीय नियुक्तीवरुन राज्यात परतले आहेत. तर प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

तर तिसरे अधिकारी रविंद्र कुमार सिंघल यांची बदली नियंत्रक मापक वैद्यमापन शास्त्र, मुंबई येथे करण्यात आली आहे. येथे ते विशेष पोलीस महानिरीक्षक समकक्ष पदावर काम पाहणार आहेत. सिंघल हे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते. तर के एम एम प्रसन्ना यांची नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून औरंगाबादच्या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख रश्मी शुक्ला व अप्पर महांचलक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांना अनुक्रमे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नागरी संरक्षण विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी बीपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी तर सदानंद दाते यांची मीरा भाईंदरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी व शुक्रवारी आयजी, अप्पर आयुक्त व अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

नवी मुंबईचे आयुक्तपदी एसीबीचे प्रभारी बिपिन कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून संजयकुमार यांची पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण व खास पथके विभागात बदली करण्यात आली आहे. तर रजनीश सेठ यांची एसीबीच्या प्रमुख बनवण्यात आले आहे. त्यांचा कायदा व सुव्यवस्था विभागाचा पदभार राजेंद्र सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या जागी एसीबीतील अपर महासंचालक आशुतोष डुबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख विनयकुमार चोबे यांची बदली करण्यात आली आहे.

एक वर्षापूर्वी घोषणा केलेल्या मीरा-भाईंदरच्या आयुक्तपदी अखेर सदानंद दाते यांची नियुक्त करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. एमआयडीतील सहआयुक्त अमितेशकुमार यांची पदोन्नतीने नागपूरच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तेथील आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची राज्य वाहतुक महामार्गाच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. तेथील अप्पर महासंचालक विनय कारगावकर यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. रेल्वेतील अप्पर महासंचालक जयजीत सिंह यांची एसीबीत बदली करण्यात आली आहे.